Google Lens म्हणजे काय?
Google Lens दृष्टिवर आधारित कंप्युटिंग क्षमतांचा संच आहे जो तुम्ही काय पाहत आहात हे समजू शकतो आणि मजकूर कॉपी किंवा भाषांतरित करण्यासाठी, वनस्पती आणि प्राणी ओळखण्यासाठी, लोकॅल किंवा मेनू एक्सप्लोर करण्यासाठी, उत्पादने शोधण्यासाठी, एकसारख्या दिसणाऱ्या इमेज शोधण्यासाठी आणि इतर उपयुक्त कृती करण्यासाठी त्या माहितीचा वापर करू शकतो.
तुम्ही जे पाहता ते शोधा
Google Lens तुम्ही जे पाहता ते तुम्हाला शोधण्याची अनुमती देते. एखादा फोटो, तुमचा कॅमेरा किंवा जवळपास कोणतीही इमेज वापरून, संपूर्ण इंटरनेटवरून परिणाम गोळा करून, Lens तुम्हाला त्यासारख्या दिसणाऱ्या इमेज आणि संबंधित आशय शोधण्यात मदत करते.
Google Lens कसे काम करते
Lens तुमच्या फोटोमधील ऑब्जेक्टची तुलना इतर इमेजशी करते आणि त्यांच्या समानतेनुसार आणि मूळ फोटोमधील ऑब्जेक्टच्या संबद्धतेनुसार त्या इमेजना रँक करते. तुमच्या फोटोमध्ये दिसणाऱ्या ऑब्जेक्टना Lens त्याच्या पद्धतीने समजून घेते आणि वेबवरून इतर संबद्ध परिणाम शोधते. रँकिंग आणि संबद्धता निश्चित करण्यासाठी, शब्द, भाषा आणि इमेजच्या होस्ट साइटवरील इतर मेटाडेटा यांसारखी इतर उपयुक्त माहिती Lens वापरू शकते.
एखाद्या इमेजचे विश्लेषण करताना, Lens सहसा बरेच संभाव्य परिणाम जनरेट करते आणि प्रत्येक परिणामासाठी संभाव्य संबद्धता रँक करते. Lens कधीकधी या शक्यतांसाठी एकच परिणाम दाखवते. असे समजू या, की Lens एका कुत्र्याकडे पाहत आहे तेव्हा ते त्याला जर्मन शेफर्ड म्हणून ओळखण्याची शक्यता ९५% आहे तर ५% कोर्गी म्हणून ओळखण्याची शक्यता आहे. याबाबतीत, Lens कदाचित फक्त जर्मन शेफर्डसाठीचे परिणाम दाखवू शकते जे Lens ने सर्वाधिक एकसारखे दिसते असे मानले आहे.
इतर बाबतीत, तुम्हाला फोटोमधील कोणत्या ऑब्जेक्टबद्दल स्वारस्य आहे हे Lens ला समजले आहे याबाबत त्याला आत्मविश्वास असेल तेव्हा, Lens त्या ऑब्जेक्टशी संबंधित शोध परिणाम दाखवेल. उदाहरणार्थ, एखाद्या इमेजमध्ये जीन्स किंवा स्नीकर यांसारखे विशिष्ट उत्पादन असल्यास, Lens त्या उत्पादनाविषयी आणखी माहिती पुरवणारे परिणाम दाखवेल किंवा उत्पादनासाठी शॉपिंगचे परिणाम दाखवेल. असे शोध परिणाम दाखवण्यासाठी, Lens कदाचित उत्पादन वापरण्याचे रेटिंग यांसारख्या उपलब्ध माहितीवर अवलंबून असू शकते. दुसऱ्या उदाहरणामध्ये, Lens ने इमेज (उदाहरणार्थ, उत्पादनाचे नाव किंवा पुस्तकाचे शीर्षक) मधील बारकोड किंवा मजकूर ओळखल्यास, Lens ऑब्जेक्टसाठी Google Search परिणाम पेज दाखवू शकते.
संबद्ध आणि उपयुक्त परिणाम
Lens नेहमी संबद्ध आणि उपयुक्त परिणाम दाखवण्याचा प्रयत्न करते. Lens चे अल्गोरिदम जाहिराती किंवा इतर व्यावसायिक व्यवस्थेमुळे प्रभावित होत नाहीत. Lens हे Google Search किंवा Shopping यांसारख्या इतर Google उत्पादनांवरून परिणाम दाखवते तेव्हा त्या उत्पादनांच्या रँकिंग अल्गोरिदमवर अवलंबून असतात.
Lens परिणाम संबद्ध, उपयुक्त आणि सुरक्षित आहेत याची खात्री करण्यासाठी, Lens सुस्पष्ट परिणाम ओळखते आणि फिल्टर करते. हे परिणाम Google सुरक्षितशोध मार्गदर्शक तत्त्वे यांसारखी Google च्या सर्व उत्पादनांसाठीची मानके वापरून ओळखले जातात.
Lens आणि स्थान
तुम्ही Lens ने तुमचे स्थान वापरण्यास सहमती दर्शवता तेव्हा ती माहिती अधिक अचूक परिणाम देण्यासाठी वापरली जाते - उदाहरणार्थ, ठिकाणे आणि खुणा ओळखताना. त्यामुळे तुम्ही पॅरिसमध्ये असल्यास Lens ला हे समजेल की, तुम्ही आयफेल टॉवर पाहत असण्याची शक्यता जास्त आणि जगातील त्यासारखी दुसरी वास्तू पाहण्याची शक्यता कमी असेल.