तुमच्या आवडीचे लूक शोधा
तुमचे लक्ष वेधून घेणारा पोशाख पाहायचा आहे का? किंवा तुमच्या बैठकीच्या खोलीसाठी अगदी योग्य असलेली खुर्ची पाहायची आहे का? तुम्ही काय शोधत आहात ते टाइप न करता याच प्रकारचे कपडे, फर्निचर आणि घराच्या सजावटीचे सामान पहा व प्रेरणा मिळवा.
मजकूर कॉपी करा आणि त्याचे भाषांतर करा
मजकुराचे १०० हून अधिक भाषांमधून रीअल टाइम भाषांतर करा. किंवा एखाद्या इमेजमधून परिच्छेद, सिरीअल नंबर आणि आणखी बरेच काही कॉपी करा, त्यानंतर Chrome वापरून ते तुमच्या फोनवर किंवा कॉंप्युटरवर पेस्ट करा.
गृहपाठ करण्यासाठी स्टेप बाय स्टेप मदत
एखादी समस्या आली आहे का? गणित, इतिहास, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि आणखी बऱ्याच विषयांसाठी वेबवर झटपट स्पष्टीकरण देणारा आशय, व्हिडिओ व परिणाम शोधा.
रोपे आणि प्राणी ओळखा
तुमच्या मित्राच्या अपार्टमेंटमध्ये कोणते रोप आहे किंवा तुम्ही उद्यानामध्ये कोणता कुत्रा पाहिला ते जाणून घ्या.
तुम्हाला आवश्यकता असेल तिथे उत्तरे मिळवा
तुमच्या सर्व डिव्हाइसवर आणि तुमच्या आवडत्या अॅप्समध्ये Lens उपलब्ध आहे.
Google अॅप
Google Camera
Google Photos
Chrome